Chhagan Bhujbal : अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर कुणाची तरी नजर आहे. छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील फार्महीऊसची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
नाशिकमध्ये भुजबळ यांचे निवासस्थान असलेले ''भुजबळ फार्म'' वर शुक्रवारी रात्री सात ते सव्वा तास वाजेच्या दरम्यान कॅमेरा ड्रोन फिरताना दिसला. कॅमेरा ड्रोनच्या सहाय्याने भुजबळ फार्मची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रेकीच्या संशयावरून भुजबळ फार्मवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत फार्मचे सुरक्षा अधिकारी दिपक म्हस्के यांनी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी भुजबळ फॉर्म ला जाऊन सदर प्रकाराची माहिती घेतली त्यानंतर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केलाय. आपल्याला कधीही गोळी मारली जाऊ शकते. पोलिसांचा तसा रिपोर्ट असल्यामुळेच आपली सुरक्षा वाढवली असल्याचंही भुजबळांना म्हंटलंय. मनोज जरांगे जाहीर धमकी देत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. तर मनोज जरांगेंनीही तिखट शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजाने दिला. नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. जातीयवादी भुजबळांनी समाजात वाद लावलेत असा आरोप करत त्यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच पंकजा मुंडे, महादेव जानकरांना आमचा विरोध नाही असं सकल मराठा समाजाने सांगितले.