'विरोधकांचे खिसे गरम, लक्ष्मीदर्शन करुन पंजाला मत द्या'

वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

Updated: Jan 5, 2020, 01:12 PM IST
'विरोधकांचे खिसे गरम, लक्ष्मीदर्शन करुन पंजाला मत द्या' title=

वाशिम : महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर ठरले आहे. या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विरोधक दिवसागणिक आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांची जबाबदारी देखील वाढली आहे. दरम्यान कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांचे खळबळजनक विधान समोर आले आहे. विरोधकांकडून लक्ष्मीदर्शन करुन कॉंग्रेसला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. वाशिमच्या कामरगाव येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

मंत्री पदाची आता आताच शपथ घेतल्याने आमचे खिसे आणखी गरम व्हायचे आहेत. विरोधकांचे खिसे मात्र पाच वर्षात गरम झाले असल्याने मतदारांनी त्यांच्या कडून लक्ष्मीदर्शन करून घ्यावे मात्र मत पंजाला द्यावे असे खळबळजनक वक्तव्य कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.  

सत्ता आणि मंत्रीपद हे खिसे गरम करून घेण्यासाठी व त्यातून निवडणुक लढविण्यासाठी असतात का? असा प्रश्न काँग्रेस च्या मंत्र्यांचे भाषण ऐकल्यावर उपस्थित होतो.