पुण्यात पुन्हा एकदा कालव्याची भिंत पडल्यानं खळबळ

पुन्हा एकदा महापालिकेने पाठबंधारे विभागाकडे बोट दाखवलंय. 

Updated: Oct 19, 2018, 03:05 PM IST
पुण्यात पुन्हा एकदा कालव्याची भिंत पडल्यानं खळबळ  title=

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कालव्याची भिंत पडल्यानं एकच खळबळ उडालीय. पुण्यातील जनता वसाहतीजवळ ही भिंत कोसळली. वीस मीटर भितींचा ढिगारा कालव्यात पडलाय. पाटबंधारे खात्यानं भागाची पाहणी करून गेल्याच आठवड्यात भराव टाकण्य़ास सुरुवात झाली. पण काम पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा भिंत खचलीय.

कालव्याच्या शेजारीच रस्ता असल्यानं जागा सुरक्षित करण्याची बॅरीगेट्स लावण्यात आले.

जबाबदारी कोणाची ?

मागच्यावेळी जेव्हा कालवा फुटला होता तेव्हा अशीच परिस्थीती होती.

आता पुन्हा एकदा महापालिकेने पाठबंधारे विभागाकडे बोट दाखवलंय.

त्यामुळे याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम आहे.