सरकारला मोठं यश, मोठ्या प्रमाणात पकडला गेला काळापैसा

नोटबंदीनंतर बँकेतील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात काळापैसा पांढरा केला. सरकारने अशा लोकांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून पकडल्या नव्या नोटा देखील पकडल्या आहेत. पोलीस आणि आयकर खात्याने छापेमारी करत 610 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत, त्यापैकी 110 कोटी रुपये 2000 आणि 500 ​​रुपयांच्या नव्या नोटांमध्ये आहेत.

Updated: Jul 9, 2017, 12:03 PM IST
सरकारला मोठं यश, मोठ्या प्रमाणात पकडला गेला काळापैसा title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बँकेतील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात काळापैसा पांढरा केला. सरकारने अशा लोकांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून पकडल्या नव्या नोटा देखील पकडल्या आहेत. पोलीस आणि आयकर खात्याने छापेमारी करत 610 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत, त्यापैकी 110 कोटी रुपये 2000 आणि 500 ​​रुपयांच्या नव्या नोटांमध्ये आहेत.

पोलीस आणि आयकर विभागाने जप्त केलेल्या नवीन नोटा पेट्रोल पंप, टोल प्लाझा रेल्वे आणि एअरलाइन तिकीट इत्यादींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले होते. कारण नोटबंदीनंतर येथे काही दिवसांपर्यंत जुन्या नोट स्वीकारल्या जात होत्या. याव्यतिरिक्त बँकेच्या काही अधिकाऱ्यानी अवैधपणे नोटा बदलून दिल्या.

नोटबंदी दरम्यान 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 तक 110 कोटी रुपयांच्या नवीन नोटा जप्त केल्यानंतर हे लक्षात आलं की नोट बदलण्याच्या व्यवस्थेत कशा प्रकारे घोटाळा झाला. या दरम्यान 1100 ठिकाणी छापे मारले गेले. या छापेमारीमध्ये 5400 कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता जप्त केली गेली. शिवाय 400 प्रकरणे असे आहेत त्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.