पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी  मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील  CCTV  फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 30, 2024, 07:03 PM IST
पब, बार मधील  CCTV  फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय title=

Pune Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणानंतर राज्यातील पब, बार आणि रेस्टॉरंट  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडावर आले आहेत. अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. पब, बार आणि रेस्टॉरंटमधील  CCTV  फुटेज राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. यामुळे पब, बार आणि रेस्टॉरंट चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

पब, बार आणि रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीचे नियंत्रण राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या हातात

पब, बार आणि रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीचे नियंत्रण आता थेट राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या हातात असणार आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलांना होणाऱ्या मद्यविक्रीला आळा घालण्याबरोबरच वेळेच्या मर्यादेचे पालन होते की नाही. त्याचप्रमाणे मद्यविक्री बाबतच्या नियमावलीचे उल्लंघन तर होत नाही ना? हे पाहण्यासाठी ही उपाययोजना अंमलात आणली जाणार आहे. कल्याणी नगर अपघातानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यावर कार्यवाही करणार आहे. पब आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलशी जोडली जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय चाललंय हे त्यांना मोबाईलवर पाहता येणार आहे.

जिथे पब आणि बार जास्त प्रमाणात आहेत तिथे नाकाबंदी

पुणे कार अपघात प्रकरणानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलंय. जिथे पब आणि बार जास्त प्रमाणात आहेत तिथे नाकाबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच पब आणि बार नियमांचं पालन करतात की नाही याचीही तपासणी केली जाणार आहे.. तसंच जिथे नियमांचं पालन करण्यात येणार नाही तिथे बार आणि पब बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेशही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ड्रँक आणि ड्राईव्ह प्रकरणानंतर पुणे जिल्ह्यातील पब आणि बार प्रशासनाच्या रडारवर आलेत. राज्य उत्पादन शुल्क विभागानं मागच्या 3 दिवसांत जिल्ह्यातील तब्बल 49 पब आणि बारवर कारवाई केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन ते सील करण्यात आलेत. या कारवाईत 1 कोटी 12 लाखांचा दंडही वसूल केला आहे. 

पुण्यातील कल्याणीनगर अपघातानंतर नागपुरातील पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. पोलिसांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्या 8 बार रेस्टॉरंट, 3 रूफ टॉपवर कारवाईचा बडगा उगारलाय. पुण्यातील घटनेनंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी बार, पबवर कारवाई करण्यात येत आहे. तर पोलिसांनी बार, रेस्टॉरंट आणि पब मालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्यास सांगितंय.