मुंबई : राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. येत्या ३ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. यामुळे एफआयआर घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईत सध्या ५ हजार सीसीटीव्ही आहेत. यात आणखी ५ हजार सीसीटीव्हींची भर पडणार आहे. यासोबतच पुण्यातही सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. नव्या इमारतींनाही सीसीटीव्ही लावणं बंधनकारक असणार आहे. या इमारतींच्या सीसीटीव्हीचा एक कंट्रोल पोलिसांकडेही असेल अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
यावेळी गृहमंत्र्यांनी नरेंद्र मेहता प्रकरणावर देखील भाष्य केले. संबंधित महिला आज तक्रार देणार असून त्यानंतर माजी आमदारांवर कडक कारवाई केली जाईल असे गृहमंत्री यावेळी म्हणाले.