मुलाला राग अनावर, जन्मदात्या पित्याचा विळ्याने गळा चिरला

 जन्मदात्या पित्याची 18 वर्ष वयाच्या मुलाकडून हत्या

Updated: Jan 4, 2021, 08:18 AM IST
मुलाला राग अनावर, जन्मदात्या पित्याचा विळ्याने गळा चिरला

चंद्रपूर : रागाच्या भरात जन्मदात्या पित्याची 18 वर्ष वयाच्या मुलानेच हत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदगाव येथील घटना आहे. ४५ वर्षांच्या शंकर फोफरे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला होता. शेतात काम करताना मुलगा राहुल याचा वडिलांसोबत क्षुल्लक वाद झाला होता.  

राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांच्या हातात असलेल्या विळ्याने हत्या करून मृतदेह शेताच्या बाजूला ओढत नेऊन टाकल्याचं तपासात उघड झालं.  पोलिसांनी अवघ्या तीन तासात चौकशीचे जाळे विणत आरोपीला ताब्यात घेतले. एकुलत्या एक मुलानं वडीलांची हत्या केल्यानं परीसरात खळबळ उडाली आहे.