प्रसिद्ध मायाचे वाघीणीची शिकारी रूप पाहून पर्यटकही थक्क

चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली सुप्रसिद्ध माया वाघीण म्हणजे, आपल्या बछड्यांसोबतच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रामुळे प्रसिद्ध पावलेली मायाळू वाघीण. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 5, 2018, 09:21 AM IST
प्रसिद्ध मायाचे वाघीणीची शिकारी रूप पाहून पर्यटकही थक्क  title=

चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली सुप्रसिद्ध माया वाघीण म्हणजे, आपल्या बछड्यांसोबतच्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रामुळे प्रसिद्ध पावलेली मायाळू वाघीण. 

आपल्या बछड्यांसोबतचा तिचं लोभस छायाचित्र भारतीय टपाल तिकिटावरही कोरलं गेलंय. नुकतीच समाज माध्यमावर तिच्या शिकारीचे काही क्षण पर्यटकांनी टिपले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या पांढरपौनी भागात तिनं शिकारीसाठी एका चितळाला निवडलं. आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या चितळाला लोळवलंही. मायाळू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मायाचे हे शिकारी रूप पाहून पर्यटकही थक्क झाले.