close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

डोक्यावर ३ भोवरे असलेल्या युगचा नरबळीच, दोघे अटकेत

चंद्रपूरात २ वर्षांच्या युग मेश्रामचा नरबळीच दिल्याचं उघड झालंय. 

Updated: Aug 30, 2018, 02:39 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूरात २ वर्षांच्या युग मेश्रामचा नरबळीच दिल्याचं उघड झालंय. ईदपासून युग बेपत्ता होता. डोक्यावर ३ भोवरे असलेल्या युगची गुप्तधनाच्या लालसेने हत्या करण्यात आलीय. शेजारी राहणाऱ्या तांत्रिकाने युगचा बळी घेतला. याप्रकरणी पोलिसांनी सुनील आणि प्रमोद बनकर यांना अटक करण्यात आलीय.

अंधश्रद्धेतून बळी 

युग मेश्राम या अवघ्या २ वर्षाच्या मुलाचा अंधश्रद्धेमुळे बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुप्तधन मिळेल या लालसेने ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ईदच्या दिवशी युग बेपत्ता झाला होता. त्याचदिवशी संध्याकाळी गावाजवळील शेतामध्ये त्याची पुजा करून त्याचा बळी देण्यात आला. पण त्याच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट त्यांना लावता न आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

दोघेही गजाआड 

याआधीच पोलीस गावात पोहोचले. त्यांनी स्वत:च्या घरीच  चाऱ्याच्या खाली खड्डा करून तिथे मृतदेह पुरला. ज्या दोन तांत्रिक मांत्रिकांनी हा प्रकार केला ते पोलिसांना तपासात सहकार्य करत होते. दोनवेळा पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तिसऱ्यावेळी पोलिसांच्या जाळ्यात ते अडकले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.