चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे 'असे' योगदान

Nagpur Chandrayan scientist: चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचेही योगदान होते अद्वैत दवने हा नागपूरकर चांद्रयन 3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.

Updated: Aug 25, 2023, 09:43 AM IST
चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञाचे 'असे' योगदान title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: नागपुरकरांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी एक बातमी समोर येत आहे. सध्या जगभरात आपल्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशाचे कौतुक सुरु आहे. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या टीममध्ये एका नागपुरकरांचा समावेश राहिला आहे. त्याने वयाच्या बाराव्या वर्षीच अंतराळ शास्त्रज्ञ (space sciense) होण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि एक तप म्हणजेच12 वर्षानंतर तो चंद्रयान 3 मोहिमेत इस्त्रोच्या टीममध्ये शास्त्रज्ञ होता. चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचेही योगदान होते अद्वैत दवने हा नागपूरकर चांद्रयन 3 मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.

सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस अद्वैत दवने मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थिती होता. महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न त्याने वयाच्या बाराव्या वर्षीच पाहिलं होतं. इयत्ता नववीला असताना अद्वैतला नासामध्ये स्पेस सायन्सशी संबंधित प्रोजेक्ट करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अद्वैतचे वडील डॉक्टर प्रदीप दवने हे विभागीय फळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहेत. तर आई भारती दवने शिक्षिका आहेत.

नागपूरच्या सोमवार शाळेचा विद्यार्थी राहिलेल्या अद्वैतने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे पुढील शिक्षण घेतले. ऑप्टिकल इंजिनियरिंगमध्ये एमटेक करणारा अद्वैत कॉलेजमध्ये अव्वल राहिला.

चांद्रयान-3 च्या यशानंतर आता सूर्य, शुक्राची पाळी; इस्रोची 'अशी' असेल संपूर्ण मोहीम

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग करता सेन्सरची महत्त्वाची भूमिका राहिली. या सेंसर टेस्टिंग टीममध्ये अद्वेतचा सहभाग होता. मुलाचा चांद्रयन 3 मध्ये असलेला सहभाग आणि योगदान पाहून वडील भारावून गेले आहेत. सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस टीव्हीवर अद्वैत मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये दिसल्यानंतर वडिलांची छाती अभिमानाने फुलली.

Bank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या

मुलाच्या चंद्रयान तीनच्या मोहिमेतील यशस्वी सहभागनंतर त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून अद्वेतने 'झी 24 तास'च्या टीमशीही बोलला.