Cidco Lottery 2022 : म्हाडापाठोपाठ आता सिडकोचीही इतक्या हजार घरासांठी मेगालॉटरी

सिडकोने मेगालॉटरी (Cidco Lottery 2022) काढणार असल्याची घोषणा केली आहे. गणेशोस्तवच्या (Ganeshotsav) मुहूर्तावर सिडकोने मेगालॉटरीचा निर्णय घेतला आहे.  

संजय पाटील | Updated: Aug 30, 2022, 09:14 PM IST
Cidco Lottery 2022 : म्हाडापाठोपाठ आता सिडकोचीही इतक्या हजार घरासांठी मेगालॉटरी title=
प्रातिनिधिक छायाचित्र

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : मुंबईत घर घेणं हे सर्वसामांन्याच्या आवाक्यात राहिलेलं नाही. त्यामुळे सर्वसामांन्याचा कळ हा मुंबईनजीकच्या भागात घर घेण्याकडे असल्याचं दिसून येतंय. आपलं हक्काचं घर घेण्याच्या विचारात आणि तयारीत असलेल्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे. सिडकोने मेगालॉटरी (Cidco Lottery 2022) काढणार असल्याची घोषणा केली आहे. गणेशोस्तवच्या मुहूर्तावर सिडकोने मेगालॉटरीचा निर्णय घेतला आहे. (cidco 31 august 2022 will be release advertisement for 4 thousand 158 house lottery on ganeshotsav)

सिडकोची सदनिका तसेच व्यावसायिक गाळे, भूखंडची मेगा लॉटरी असणार आहे. सिडको उद्या (31 ऑगस्ट) गणेश चर्तुथीला ऑनलाईन जाहीरात प्रसिद्ध करणार आहे. तर ग्राहकांना गुरुवारपासून अर्ज करता येणार आहे. एकूण  4 हजार 158  घरांसाठी, 245 दुकाने आणि 6 व्यावसायिक भूखंडाची ही लॉटरी असणार आहे. 

घरं कुठे असणार? 

नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोड इथे ही घरं आहेत. परवडणाऱ्या दरातील या 4 हजार 158 घरांपैकी 404 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकांकरिता आणि उर्वरित 3 हजार 754 घरं ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा रू. 6,00,00 तर अनुदानाची रक्कम रू. 2,50,000 निश्चित करण्यात आली आहे.  नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत.

या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली असून आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध असल्याचे डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं. 

वाणिज्यिक गाळे आणि भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

त्याचप्रमाणे सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण 245 वाणिज्यिक गाळेसुध्दा गणेशोत्सवाच्या निमित्ताने विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले आहेत. 

तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी 3 याप्रमाणे एकूण 6 व्यावसायिक कार्यालये (कमर्शिअल प्रिमायसेस) व तारांकीत हॉटेलसाठी 1, निवासी वापरासाठी 64 तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी 5 भूखंड विक्रीकरीता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 

उपरोक्त योजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार असल्याचे सिडको द्वारे कळविण्यात आले आहे.

म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 

म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच आता बदल करण्यात येणारेय. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रं ऑनलाइन जमा करावी लागणारेत. त्याशिवाय अर्ज भरताच येणार नाही. 

कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे पात्रता आधीच निश्चित झाल्यानं विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणारेय. नव्या सोडत प्रक्रियेसाठी म्हाडाकडून नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात येतंय. या प्रणालीची चाचणी आयआयटीकडून केली जाणारेय. अर्जदारांना सोप्या पद्धतीनं अर्ज भरता यावा यादृष्टीनं या प्रणालीची रचना असेल.