नवी मुंबई : CIDCO housing News : सिडकोच्या ( CIDCO ) घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागील गृह योजनेतील अनेक घरे विक्रीविना धूळ खात आहे. घरांची विक्री होत नसल्याने सिडकोला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यासाठी सिडकोने एक मोठा निर्णय घेतला आहे. (CIDCO's big decision on housing scheme)
सिडकोच्या घरांची विक्री होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागवल्या आहे.
निविदेनुसार नियुक्त होणाऱ्या कंपनीवर घरांच्या मार्केटिंगसह विक्री आणि इतर संबंधित कामे करावी लागणार आहेत. येत्या काळात नवी मुंबईत सिडको 67 हजार घरे बांधणार आहे. त्या घरांची विक्री करण्याची जबाबदारी पात्र ठरणाऱ्या खासगी संस्थेकडे दिली जाणार आहे.