Theft : सोनं, पैसा काही नको, या चोराचे शौकच वेगळे, अनोख्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

या चोरट्यांनी खिडकीवर चढून अशी वस्तू चोरली की सगळेच शॉक झाले. बदलापुर (Badlapur) मध्ये झालेल्या या अनोख्या चोरीची जोरदार चर्चा रंगली आहे.  

Updated: Feb 4, 2023, 03:45 PM IST
Theft : सोनं, पैसा काही नको, या चोराचे शौकच वेगळे, अनोख्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : सध्या सगळीकडेच चोरांचा सुळसुळाच वाढला आहे. चोरटे मौलवान वस्तूंसह अगदी कार आणि बाईक देखील चोरत आहेत. बदलापुरात (Badlapur) मात्र, अजब चोरी झाली आहे. बदलापुरात खिडकीत वाळत टाकलेले कपडे चोरीला गेले आहेत.  कपडे सुकत टाकण्याचीही सोय नाही अशी चर्चा रंगली आहे. कपडे चोरीचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद (CCTV) झाला आहे (crime news). 

खिडकीत वाळत टाकलेले कपडे चोरीला गेले आहेत. बदलापूरातील एका सोसायटीत हा प्रकार घडला आहे. मात्र, हा चोर कपडे चोरताना इमारतीच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अनोख्या चोरीचा सर्व घटनाक्रम कैद झाला आहे.

बदलापूर पश्चिम येथील शनीनगर परिसरातील हेरंब अपार्टमेंट या इमारतीत हा प्रकार घडला आहे. हेरंब अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणाऱ्या एका राहिवाशाने फ्लॅटमधील आपल्या खिडकीत कपडे वाळत टाकले होते.  

रात्रीच्या सुमारास एका चोरट्याने खिडकीवर चढून वाळत टाकलेले ब्लॅंकेट, कपडे चोरुन नेले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला आहे. एक तरुण खिडकीवर चढत आहे. यानंतर तो कपडे खिडकीतून खेचून घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 

सध्या बदलापुरात चोरांचा  सुळसुळाट झाला असून आता वाळत टाकलेले कपड्यांवरही चोरट्यांची नजर पडली आहे.  या अजब चोरीची बदलापुरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. वाळत टाकलेले कपडले या चोरट्याने का चारले असावेत असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या चोरट्यांचा बंदबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.