सिडको भूखंडाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर

पावसाळी अधिवेशनात गोंधळाचं वातावरण

Updated: Jul 5, 2018, 02:10 PM IST
सिडको भूखंडाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर title=

मुंबई : सिडकोच्या भूखंड वाटपाचा अधिकार मंत्र्यांना नसून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचं सांगत आज मुख्यमंत्री फडवीसांनी विरोधाकांच्या आरोपांना आज सडेतोड उत्तर दिलं आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज सकाळपासून गोंधळाचं वातावरण आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला आहे. दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होताच दोनवेळा तहकूब करण्यात आले.

शेतकरी कर्जमाफी आणि सिडको भूखंड खरेदी विक्री प्रकरण हे विषय दोन्ही सभागृहात जोरदार गाजणार अशी चिन्ह होती. विधानपरिषदमध्ये कामकाजात नाणार प्रकल्पावर लक्षवेधी प्रश्न मांडण्यात आले.  पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारविरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर याआधी निदर्शने केली. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडलं. शेतकरी कर्जमाफी, पिक विमा, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना न मिळालेल्या मदतीच्या मुद्यांवर घोषणाबाजी करण्यात आली.