कधीकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय, विधानसभेच्या तोंडावर राहुल कनालांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी

Rahul Kanal Responsibility in Shivsena: राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंच्या युवासेना कार्यकरीमध्ये होते. आता शिंदे गटात त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2024, 02:55 PM IST
कधीकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय, विधानसभेच्या तोंडावर राहुल कनालांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी title=
राहुल कनाल यांच्याकडे नवी जबाबदारी

Rahul Kanal Responsibility in Shivsena: कधीकाळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात गेले. आदित्य ठाकरेंसाठी हा खूप मोठा धक्का होता. दरम्यान राहुल कनाल यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राहुल कनाल हे बॅालिवूड आणि क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहेत. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सलमान खान, संजय दत्त विराट कोहली सुर्यकुमार यादव यांच्यासारख्या दिग्गज हिरोंच्या सोशल मीडियावर ते झळकत असतात. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंच्या युवासेना कार्यकरीमध्ये होते.

मुंबईसह भारतभरात काम 

राहुल कनाल यांची आता शिवसेनेची सोशल मीडियाच्या राज्यप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष राहुल कनाल हे राजकीय, बॅालिवूड आणि क्रिकेट जगतातल्या लोकांसाठी काम करत आहे, आय लव्ह मुंबई च्या माध्यामातून राहुल कनाल यांनी मुंबईच नव्हे तर भारतभर काम केलं आहे.
मुक्या प्राण्यांना अन्नदानापासून ते त्यांना राहण्याची व्यवस्था राहुल कनाल यांनी केली आहे, कोरोना काळात राहुल कनाल यांनी केलेलं कामांची पोचपावती अनेक वेळा सोशल मीडियांच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींनी दिलेली आहे. 

काय म्हणाले राहुल कनाल?

राहुल कनाल यांचे शिवसेनेच्या सोशल मीडिया प्रमुख पदी निवड झाल्याचे पत्रक शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट केले. यानंतर राहुल यांनी त्यांचे आभार मानले. आदित्य ठाकरेंचे दुसरे निकटवर्तीय आणि सध्यचे शिंदे गटाचे नेते अमेय घोले यांनीदेखील राहुल कनाल यांना शुभेच्छा दिल्या.

विधानसभेच्या तोंडावर जबाबदारी 

आता विधानसभेच्या तोंडावर राहुल कनाल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे, एकेकाळी आदित्य ठाकरेंच्या जवळचे व मातोश्रीचे निकटवर्तीयांरैकी एक राहुल कनाल यांना मानलं जायचं त्यामुळे सोशल मीडियांच्या प्रमुखपदी आल्यानंतर राहुल काही मोठे गौप्यस्फोट करणार का ? हे पाहावं लागेल.