King Cobra ला वाचवण्यासाठी तो विहिरीत उतरला अन्...; अंगावर काटा आणणारा Video पाहिलात का?

Cobra Fell In The Well Man ent Down To Save Snake Life: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आठ लाखांहून अधिक लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.

Updated: Feb 3, 2023, 04:07 PM IST
King Cobra ला वाचवण्यासाठी तो विहिरीत उतरला अन्...; अंगावर काटा आणणारा Video पाहिलात का?
king cobra well

Cobra Fell In The Well Man ent Down To Save Snake Life: सापाचं केवळ नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. घराच्या आजूबाजूला किंवा घरात साप सापडल्याचं समजलं तरी आजूबाजूचे लोक हा साप पाहण्यासाठी गर्दी करतात. अडगळीच्या जागांमध्ये घराच्या आजाबूजाला साप आढळून येण्याच्या घटना अनेकदा घडतात. सोशल मीडियावर अनेकदा सापांचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. बऱ्याच वेळा किंग कोब्रा आणि इतर साप कधी गाड्यांमध्ये तर कधी छप्परावर लपल्याचं या व्हायरल व्हिडीओंमध्ये पहायला मिळतं. मात्र सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक किंग कोब्रा विहिरीत पडल्याचं दिसत असून या सापाला वाचवण्यासाठी एक तरुण चक्क विहिरीत उतरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये विहिरीत पडलेल्या सापाला (Cobra Fell In The Well) वाचवण्यासाठी एक व्यक्ती कंबरेला रस्सी बांधून विहिरीत उतरताना दिसत आहे. एका हातामध्ये पिशवी पकडून हा तरुण दुसऱ्या हाताने शेपटी पकडताना दिसत आहे. एकीकडे हा तरुण सापाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे हा साप वारंवार फणा कढून या तरुणाला चावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही ही व्यक्ती फार शांतपणे सापाला हाताळताना दिसत आहे. ही व्यक्ती सापाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तर साप मात्र याचा व्यक्तीवर हल्ला करताना व्हिडीओत दिसत आहे. 

बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर या व्यक्तीला हा साप पिशवीमध्ये टाकण्यात यश आलं आणि विहिरीच्या कठड्यावरुन व्हिडीओ शूटींग करणाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. हा व्हिडीओ जुन्नरमधील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑफिशिअल सर्पमित्र 12 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणाने आपला जीव धोक्यात टाकून या कोब्राचा जीव वाचवला. या व्हिडीओला 8 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट्मध्ये या तरुणाचं कौतुक केलं आहे. 'रिस्क घेऊ नकोस भावा' असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एकाने अशा कामांसाठी सरकारने पैसे द्यायला हवेत असं म्हटलं आहे. तर काहींनी अशा तरुणांची दखल वनखात्याने घेतील पाहिजे असं म्हटलेलं.