Nashik Accident: कामावरुन परतलेल्या बाबांना भेटायला चिमुकली गेली अन्..परतलीच नाही!

Nashik News: मुलगी आणि वडिलांच (Father and daughter relation) नात अतूट असतं...वडिलांसाठी मुलगी म्हणजे परकं धन असंही म्हटलं जातं. मात्र, तरीही बाप आपल्या मुलीला जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत जिवापार जपत असतो.परंतु बापाच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अपघाती मृत्यू होत असेल तर ...अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक शहरातील (Nashik News) अंबड परिसरात (Ambad Area) घडली आहे.

Updated: Feb 6, 2023, 06:00 PM IST
Nashik Accident: कामावरुन परतलेल्या बाबांना भेटायला चिमुकली गेली अन्..परतलीच नाही!
नाशिक अपघात

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या (Nashik News) अंबड लिंक रोडवर झालेल्या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कारखाली येऊन झालेल्या अपघातात (Nashik Accident) 14 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिकच्या अंबड रोडवर हा अपघात घडलाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या चिमुकलीला गाडीने धडक दिली. त्यानंतर गाडीच्या चालकाने 14 वर्षाच्या चिमुकलीला अक्षरक्षः चिरडून पळ काढला. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

मुलगी आणि वडिलांच नात (Father and daughter relation) अतूट असतं...वडिलांसाठी मुलगी म्हणजे परकं धन असंही म्हटलं जातं. मात्र, तरीही बाप आपल्या मुलीला जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत जिवापार जपत असतो.परंतु बापाच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अपघाती मृत्यू होत असेल तर ...अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक शहरातील अंबड परिसरात घडली. 14 महिन्याच्या चिमुकलीचा वडिलांसमोर गाडी येऊन अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

काय आहे घटना...

अमझद अख्तर खान हे मुळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी. पत्नीच्या उपचाराकरिता अमजद १५ दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले होते. अमजद खान, पत्नी आणि मुलगी आयेजा यांच्या नातेवाईकांच्या घरी आले आहेत. उपचाराकरिता पैश्यांची गरज असल्याने अमजदने नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील खाजगी कंपनीत कामाला सुरवात केली. 

बुधवारी अमझद खान नेमही प्रमाणे कामावर गेले होते. सायंकाळी वडील कामावरून घरी आले यावेळी आयजा घराच्या दारात उभी होती. दारातून आयजाला तिचे वडील दिसले अन आयजा आनंद झाला. वडिलांना मिठी मारण्यासाठी आयजा घरातून वडिलांकडे धावत गेली मात्र वडिलांच्या डोळ्यासमोरच 14 महिन्याची आयजा गाडीखाली आली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झला.

अशी घडली घटना...

आयजा घराबाहेर आली त्याचवेळी अमजद खान यांच्या घराशेजारी राहणाऱ्या हसनेन मुजम्मिल खान हे त्यांचे चार चाकी वाहन (क्रमांक एम. एच.15 एच. क्यू. 5686) घेऊन घराबाहेर निघाले. त्यांच्या गाडीची धडक रस्ता ओलांडून वडिलांकडे जाणाऱ्या आयाजास  बसली. गाडीची धडक लागून आयजा गाडीच्या चाकाखाली आली. आयजा गाडीच्या खाली आली हे वाहन चालकाच्या लक्षात न आल्याने वाहन निघून गेले.अमझद यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आयजाला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. वाहन चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.