राज्यात पुन्हा एकदा थंडीचं आगमन होणार

 राज्यातून गायब झालेल्या थंडीचं संक्रांतीदरम्यान पुन्हा एकदा आगमन होणार 

Updated: Jan 13, 2021, 10:00 AM IST
राज्यात पुन्हा एकदा थंडीचं आगमन होणार title=

मुंबई : राज्यातून गायब झालेल्या थंडीचं संक्रांतीदरम्यान पुन्हा एकदा आगमन होणार आहे. ढगाळ स्थिती निवळल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ही शक्यता व्यक्त केलीय. अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या बहुतेक भागांत गेल्या आठवडय़ात ढगाळ वातावरण होतं. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागांत काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरीही लावली. या वातावरणानंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली होती. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येणार आहे.

ढगाळ स्थिती निवळल्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे थंडीटी लाट येण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. राज्यात आता हवामान कोरडे राहणार आहे. ढगाळ वातावरण हळूहळू ओसल्यानंतर आता थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.