काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाची आजपासून सुरुवात

आज अहमदनगरमधून काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे.

Updated: Oct 31, 2017, 08:24 AM IST
काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाची आजपासून सुरुवात title=

अहमदनगर : आज अहमदनगरमधून काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाची सुरुवात होणार आहे.

सरकारची तीन वर्षातली कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

सरकारच्या कामगिरीचा निषेध करण्यासाठी आजपासून जनआक्रोश आंदोन करण्यात येणार आहे. अहमदनगरपासून या आंदोलनाला सुरुवात होणार असून सांगलीत जाहिर सभेने या आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे.

या आंदोलनाद्वारे काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. शिवाय ८ नोव्हेंबरला नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, देशाचं मोठं नुकासान झालं त्यामुळे ८ नोव्हेंबरला काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे.

कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नाही. अटी शर्ती घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळलं आहे. सर्वत्र कर्जमाफीचा गोंधळच सुरु असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे.