Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat Resignation) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनाम्याचं शस्त्र उपसलं आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (congress leader Balasaheb Thorats Resignation from the post of group leader latest Marathi news )
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी तातडीने दखल घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.एच.के. पाटील हे मुंबईत बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असून त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचामधील वाद विकोपाला गेला आहे. आता हा वाद थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्लीला पाठवला आहे. अजून हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे, अशा आशयाचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Balasaheb Thorat Letter) पाठवलं आहे. त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस बाहेर आली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे. पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता नाना पटोलेंसोबत काम करू शकत नाही, असं आपण पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. मात्र, आता थोरातांचा राजीनामा काँग्रेसचे हायकंमाड स्वीकारणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. आता हा वाद थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचला आहे. बाळासाहेब थोरात यांनी थेट अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांना पत्र लिहून मनातील खदखद व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत आपण काम करू शकत नाही, असं थोरात यांनी हायकमांडला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाना पटोले यांच्या मनात आपल्याबाबत खूप राग आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे.पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.
नाशिक विधान सभा निवडणुकीदरम्यान नाना पटोले यांनी आपल्याला अपमानीत केलं. तसेच सत्यजित तांबे यांच्या निवडणूक लढण्यावरून आपल्याला टार्गेट केलं. कुटूंबीयांबाबत आपल्यावर आरोप-प्रत्यारोप केले. यावरून अहमदनगर जिल्ह्यातील काही नेत्यांवर पक्षांतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. नाना पटोले यांनी गेल्या 26 जानेवारीला काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी देखील बरखास्त केली होती. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सत्यजीत तांबे यांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे देखील नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. हायकमांड सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेऊन आहे. असंही सांगत नाना पटोले यांनी पक्षांतर्गत वादाला बगल दिली.