close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सत्यजित देशमुखांचा भाजपा प्रवेश निश्चित ?

सत्यजित देशमुख हे भाजपाकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Updated: Jul 22, 2019, 08:30 AM IST
सत्यजित देशमुखांचा भाजपा प्रवेश निश्चित ?

सांगली : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. देशमुख यांच्याशी भाजपा नेत्यांची बोलणी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सत्यजित देशमुख हे भाजपाकडून शिराळा विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषद मिळणार असल्याबाबत चर्चा सुरू आहे. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वाची घटना महत्वाची मानली जात आहे. 

भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. सत्यजित यांना आपल्याकडे खेचण्यासाठी मागच्या सहा महिन्यापासून प्रयत्न सुरु होते. सत्यजित यांच्या सोबत काँग्रेसमधील नाराज नेते देखील भाजपात येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ३ ते ४ नेत्यांची नावे समोर आहेत. त्यात सत्यजित देशमुखांचे नाव आघाडीवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.