'काँग्रेस - राष्ट्रवादी यांचे भविष्यात विलिनीकरण'

 भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील, असे भाकीत करण्यात आले आहे.

Updated: Oct 8, 2019, 06:57 PM IST
'काँग्रेस - राष्ट्रवादी यांचे भविष्यात विलिनीकरण' title=

सोलापूर : भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील, असे भाकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे मोठे विधान केले आहे. दोन्ही पक्ष थकले आहेत. जी खंत काँग्रेसच्या मनात आहे, तशीच पवारांच्याही मनात असेल. जेव्हा वेळ येईल तेव्हा पक्षांचे विलिनीकरण होईल, याची सुरूवात सोलापुरातून झाल्याचे शिंदे म्हणाले. तर दुसरीकडे पुढच्या वेळी राज्यसभेत जाण्याइतके संख्याबळही राष्ट्रवादी काँग्रेसकडे नसेल, असा दावा खासदार संजय काकडे यांनी केला आहे.  

आम्हीही म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस देखील थकले आहोत, असे सांगत  काँग्रेसच्या एका झाडाखाली, एका आईच्या मांडीवर आम्ही वाढलो आहोत. असे ते सांगायला विसरले नाहीत. या एकत्रीकरणाची सरुवात  सोलापुरातून झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनात सुशीलकुमार शिंदे यानी हे वक्तव्य केले आहे.