उद्धव ठाकरे - अमित शहा भेटीवर अशोक चव्हाण म्हणतात...

...

Updated: Jun 8, 2018, 10:46 AM IST
उद्धव ठाकरे - अमित शहा भेटीवर अशोक चव्हाण म्हणतात... title=

सांगली : दलित चळवळ बदनाम करण्यासाठीच एल्गार परिषदेच्या आयोजकांवर कारवाई सूरु केली आहे, तसेच भिडे आणि एकबोटे यांच्या वरील लक्ष दुसरी कडे वळवण्यासाठी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर कारवाई केली जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अमित शहा यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट म्हणजे हा फक्त सौदेबाजीचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केलीय. भाजपाचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी बाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, आघाडी बाबतचा निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हेच घेणार आहेत असही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.