ब्रिटानिया कंपनीला २५ हजारांचा दंड

रॅपरवर छापील आणि मूळ बिस्किटांच्या वजनात फरक आढळल्याने ब्रिटानिया कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 1, 2018, 08:56 AM IST
ब्रिटानिया कंपनीला २५ हजारांचा दंड  title=

नवी दिल्ली : रॅपरवर छापील आणि मूळ बिस्किटांच्या वजनात फरक आढळल्याने ब्रिटानिया कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ग्राहक न्यायालयाने ब्रिटानियाला २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. ग्राहक तक्रार निवारण मंचाने ब्रिटानियाच्या अहमदाबाद शाखेच्या कंपनीला हा दंड ठोठावला.

६ हजार नुकसान भरपाई 

 लालजी पटेल यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

ग्राहक मंचाने दिलेल्या निर्णयानुसार ब्रिटानियाला २५ हजाराचा दंड ठोठावण्यासोबतच याचिकाकर्त्याला ६ हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. 
 
 २०१२ मध्ये खरेदी केलेल्या ४ बिस्किट पॅकेटवर छापील आणि मूळ वजनात फरक आहे.

त्यानंतर लालजी यांनी स्थानिक आईएसओ ९००१ प्रमाणित प्रयोगशाळेत याची तपासणी केली. 

असा आढळला फरक

 चारही बिस्कीट पॅकेस्टसवरील वजन १२२.५ ग्रॅम आहे. पण बिस्किटांचे वजन हे अनुक्रमे १०४ ग्रॅम, ११२ ग्रॅम, ११४ ग्रॅम आणि ११७ ग्रॅम असे आढळले.

यानंतर त्यांनी ग्राहक मंचाकडे याची तक्रार केली.