कोरोनाचे संकट : राज्यात पुन्हा प्रादुर्भाव; मुंबई, ठाण्यात बाधित नवीन रुग्ण वाढले

Coronavirus in Maharashtra : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत. 

Updated: Sep 10, 2021, 10:20 AM IST
कोरोनाचे संकट : राज्यात पुन्हा प्रादुर्भाव; मुंबई, ठाण्यात बाधित नवीन रुग्ण वाढले title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे साडेचारशे रुग्ण वाढले आहेत. तर साडेतीनशेच्या आसपास रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मुंबईत चार हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यातही 300च्या आसपास रुग्णवाढ झाली आहे. 

मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.06 टक्के

मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढत असून गुरुवारी कोरोनाचे 458 नवीन रुग्ण आढळले. तर सहा जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 581 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे एकूण 16 हजार 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 48 हजार 712 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 96 लाख 253 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा दर 0.06 टक्के आहे तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1206 दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यातही कोरोनाचा धोका

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी 286 कोरोना रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा मृत्यू झाला. ठाण्यात 85, कल्याण-डोंबिवली 67, नवी मुंबई 60, मिरा भाईंदर 30, बदलापूर 19, ठाणे ग्रामीण 11, अंबरनाथ 9, उल्हासनगर 4 आणि भिवंडीमध्ये एक रुग्ण आढळून आला. तिघांचा मृत्यू झाला आहे. यात कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात नव्याने रुग्णांची भर

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 4219 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 55 जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात 2538 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्या 50 हजार 229 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत रायगड येथे 64, पनवेल शहर 74, नाशिक 78, अहमदनगर 798, पुणे 541, पुणे शहर 233, पिंपरी-चिंचवड 188, सोलापूर 267, सातारा 393, कोल्हापूर 67, सांगली 320, रत्नागिरी 49, बीडमध्ये 60 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.