कोरोना इफेक्ट : पुण्यातील हॉटेल ३ दिवसांसाठी बंद राहणार

कोरोनाचा वाढचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यातील सगळी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद

Updated: Mar 17, 2020, 05:04 PM IST
कोरोना इफेक्ट : पुण्यातील हॉटेल ३ दिवसांसाठी बंद राहणार title=

पुणे : कोरोनाचा वाढचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यातील सगळी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार ते शुक्रवार असे ३ दिवस पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी आजपासून पुण्यातली दुकानं तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारपेठेतली मेडिकल, किराणा जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत.

पुण्यातील कोरोना व्हायरसचा फैलाव हा दुसऱ्या टप्प्यावर आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. पण यात संचार बंदी नसेल अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. तसंच ज्या खासगी कंपन्यांना शक्य आहे त्या कंपन्यांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे, आदेश देण्यात आले आहेत.

भारतामध्ये कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.