अहमदनगर : राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची माहिती प्रसारित करु नये असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाबत अफवा फसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कारवाईचा इशाराही देणअयात आला होता. तरीही काही जणांकडून अफवा पसरविण्यात येत आहेत. अहमदनगरमध्ये अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी बीड, पुणे येथेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे कोणीही कोरोना बाधित रुग्ण आणि कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
#BreakingNews । अहमदनगर । कोरोनाच्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावर माहिती प्रसारित केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल. कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांवर आणि तोफखाना पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल #Coronavirus #covid19 India @ashish_jadhao #CoronaInMaharashtra pic.twitter.com/v6bXO8kygC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 19, 2020
कोरोनाच्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावर माहिती प्रसारित केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांवर आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई जवळच्या वसईत कोरोना व्हायरसबाबत औषध विकणाऱ्या दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवर जगात कुठेही औषध उपलब्ध नाही. असे असताना औषध देण्याखाली लूट होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत.
कोरोना विषाणू येवल्यात दाखल अशी अफवा दोन तरुणांनी पसरवली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोरोनाची अफवा पसणाऱ्या या दोन तरुणांना येवला तालुका पोलिसांनी अटक केली. नाशिक जिल्ह्यातील कोरोना विषयी अफवा असणारा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. याआधी बीड आणि पुण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीड येथे कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आष्टीमध्ये कोरोणाचा रुग्ण आढळला आहे, व्हाट्सअपला स्टेटस ठेवणाऱ्या आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्या अशा दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच पुण्यातही असाच गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती दिली होती.