कोल्हापूरनं वाढवली चिंता, मुंबईपेक्षा दुप्पट रुग्णसंख्या?

राज्यात कोरोना आटोक्यात येत असताना कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांची स्थिती काहीशी चिंताजनक आहे. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक आहे. कोल्हापुरातली परिस्थिती सुधारली नाही, तर अधिक कडक निर्बंधांची टांगती तलवार आहे. 

Updated: Jun 14, 2021, 10:36 PM IST
कोल्हापूरनं वाढवली चिंता,  मुंबईपेक्षा दुप्पट रुग्णसंख्या?

प्रताप नाईक, कोल्हापूर : राज्यात कोरोना आटोक्यात येत असताना कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांची स्थिती काहीशी चिंताजनक आहे. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक आहे. कोल्हापुरातली परिस्थिती सुधारली नाही, तर अधिक कडक निर्बंधांची टांगती तलवार आहे. 

कोल्हापुरात कडक निर्बंध लागणार?

कोल्हापूरमध्ये दिवसागणिक कोरोनाची स्थिती अधिक बिघडत चाललीये. रविवारी जिल्ह्यात दीड हजारांवर नवे कोरोनाबाधित आढळलेत. ही वाढ मुंबईच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे सरकारही सावध झालं असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी कोल्हापुरात निर्बंध शिथिल होणार नसून नियम आणखीनच कडक होणार असल्याचं संकेत  उपमुख्यमंत्र्यांनी दिले. 

- सध्या राज्यात 15 जिल्हे लेव्हल एकमध्ये आहेत. 
- लेव्हल दोनमध्ये 2 तर लेव्हल 3मध्ये 13 जिल्हे आहेत. 
- चौथ्या लेव्हलमध्ये 5 जिल्हे आहेत. 
- कोल्हापूरसह सातारा, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या लेव्हलमध्ये आहे. 

आता जिल्ह्यांना अधिकार दिले असून परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी नागरिकांचीही असल्याचं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

पॉझिटीव्हिटी रेटमध्ये कोल्हापूर सध्या राज्यात अव्वल नंबरवर आहे.  पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जाणार आहे. तसंच टेस्टिंग दीडपट ते दुपटीनं वाढवण्याचे आदेश सरकारनं दिलेत. राज्यात दुसरी लाट आटोक्यात येत असताना कोरोना वाढत असलेले हे जिल्हे तिस-या लाटेला आमंत्रण देऊ शकतात.