सिरो सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, नागपुरात 80 टक्के लोकांमध्ये आढळल्या अँन्टिबॉडी

शहरात धंतोलीत तर ग्रामीण पारशिवनी तालुक्यात सर्वाधिका लोकांमध्ये आढळल्या अँन्टिबॉडी

Updated: Dec 8, 2021, 09:17 PM IST
सिरो सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर, नागपुरात 80 टक्के लोकांमध्ये आढळल्या अँन्टिबॉडी title=

अमर काणे, झी 24 तास, नागपूर: महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने एन्ट्री केली आहे. या व्हेरिएंटमुळे प्रशासन सतर्क झालं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 8 नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता लसीकरण मोहीम जोरात सुरू झाली आहे. नागपूरमध्ये सिरो सर्वेक्षणात एक मोठी माहिती समोर आली आहे. 

नागपूर जिल्हातील सिरो सर्वेक्षणात शहर आणि ग्रामीण असे दोन्ही मिळून 80 टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे. शहरी भागात 84 टक्के, तर ग्रामीण भागात साधारण 75. 92 टक्के अँन्टिबॉडी आढळून आल्या आहेत. 

शहरातील दहा झोनमधील धंतोली झोनमध्ये सर्वाधिक 88.06 टक्के अँन्टिबॉडिजचे प्रमाण असल्याची माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागातील पारशिवनी तालुक्यात 86.22 टक्के लोकांमध्ये सर्वाधिक अँन्टिबॉडिज आढळल्या.

नागपूर जिल्ह्यात अनेकांना कळत नकळत अनेकांना कोरोनाची लागण होवून गेली. या काळात कोणाच्या शरीरात कोरोनाच्या अँन्टिबॉडी तयार झाल्या. याचा शोध घेण्यासाठी सिरो सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान साधारण 6 हजार 100  लोकांचे नमुने घेण्यात आले. 

या सिसो सर्वेमध्ये नागपूर जिल्ह्यातील 80 टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोनाशी लढा देणारी रोगप्रतिकारक शक्ती (अँन्टिबॉडी) तयार झाल्याचं समोर आलं. महापालिका हद्दीतील 10 झोनमधील प्रत्येकी 4 वॉर्डातील एकूण 3 हजार 100 नमुने घेण्यात आले होते. 

ग्रामीणमधील 13 तहसीलमधून प्रत्येकी 1 मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण 3 हजार नमुने गोळा करण्यात आले. यासाठी 6 ते 12,12 ते 18, 18 ते 60 आणि 60 हून अधिक अशा वयोगटाचे चार गट तयार करण्यात आले होते. सर्वेक्षणाचे महिनाभर नमुने तपासणीचे काम मेडिकलमध्ये सुरू होते.

शहरात झोननिहाय स्थिती
झोन अँन्टिबॉडी
लक्ष्मीनगर- 86. 86 टक्के
धरमपेठ- 87.29  टक्के
हनुमाननगर- 78.85 टक्के
धंतोली- 88.06 टक्के