Coronavirus : राज्यात मास्क लावणे अनिवार्य आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार

Mask Free : राज्यात कोरोनाचा संसर्ग कायम दिसून येत आहे. सध्या मृत्यूच्याप्रमाणात वाढ दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना आटोकात आहे. असे असले तरी राज्यात यापुढे काळजी घेतली पाहिजे. मास्क लावणे अनिवार्य आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

Updated: Jan 29, 2022, 02:58 PM IST
Coronavirus : राज्यात  मास्क लावणे अनिवार्य आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार  title=
संग्रहित छाया

पुणे : No Mask Free : राज्यात कोरोनाचा संसर्ग कायम दिसून येत आहे. सध्या मृत्यूच्याप्रमाणात वाढ दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी कोरोना आटोकात आहे. असे असले तरी राज्यात यापुढे काळजी घेतली पाहिजे. मास्क लावणे अनिवार्य आहे, असे सांगत 'मास्क फ्री महाराष्ट्र' असा काहीही निर्णय झालेला नाही आणि होणार नाही. त्यामुळे चुकीच्या वृत्तावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

दरम्यान, 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करणार आहोत, अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क मुक्ती संदर्भात मंत्रिमंडळात कुठलीच चर्चा झाली नाही. ती बातमी चुकीची आहे. आपल्याकडे मास्क लावणे अनिवार्य, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोना महामारीमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यात मास्क घालण्याच्या सक्तीतून सूट देण्याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याचे वृत्त समोर आले. मात्र यावर राज्यातील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असे काहीही ठरलेले नाही, असे स्पष्ट केले. आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्यात मास्कची सक्ती हटवली जाईल, असा गैरसमज लोकांनी काढून टाकावा. मास्क हे स्वतःला वाचवण्यासाठी सगळ्यात चांगले हत्यार आहे, असे त्यांनीही स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी राज्यात मास्क घालणं बंधनाकारक आहे. मास्कमुक्ती संदर्भात महाराष्ट्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क बंधनकारक आहे.

दरम्यान, कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, मास्कचा वापर बंधनकारक नसल्याचा निर्णय घेतलेल्या इतर देशांचा अभ्यास सुरु आहे. अभ्यासानंतर त्याचा अहवाल सरकारला दिला जाईल. मात्र, राज्याला मास्क फ्री व्हायला वेळ लागेल. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस राज्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत मास्कची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.