मास्क न घालता बाहेर पडाल तर याद राखा! नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई

मास्क न वापरता घराबाहेर पडत असाल किंवा असून तो वापर नसाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी

Updated: Dec 28, 2021, 08:37 PM IST
मास्क न घालता बाहेर पडाल तर याद राखा! नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई title=

औरंगाबाद : राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना लोक अद्याप गाफील आहेत. मास्कचा वापर होताना दिसत नाहीत. त्यामुळे आता मास्क न वापरणा-या बाईक चालकांना चाप लावण्यासाठी औरंगाबाद आरटीओनं कंबर कसली आहे. 

कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका वाढत असताना औरंगाबाद आरटीओनं मास्क न लावणा-या चालकांना वठणीवर आणण्यासाठी कंबर कसली आहे. आता दुचाकीवरून मास्क न लावता जाणा-या चालकाचा फोटो काढून थेट कार्यालयाला पाठवला जाणार आहे. तिथं ई-चलान फाडण्यात येईल आणि गाडीवरचा दंडाचा बोजा वाढेल. 

गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. आरटीओमधून मेल आणि मोबाईलवर दंडाचा मेसेज पाठवला जातोय. अंदाजे आठवडाभर ई-चलनाची रक्कम भरली नाही, तर वाहन थेट काळ्या यादीत टाकण्यात येईल. दंड भरल्यानंतरच वाहन पुन्हा रस्त्यावर आणता येईल. 

लसीकरण वाढवण्यासाठी आणि मास्कचा वापर व्हावा यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. मात्र याला जनतेनंही सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे. अन्यथा तिसरी लाट आणि पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे.