Coronavirus : लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही

महाराष्ट्रात कोरोनाचा पार्श्वभूमीवर संचारबंदी 

Updated: Apr 19, 2020, 07:54 AM IST
Coronavirus : लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात एसटीला आतापर्यंत ७ लाख कोटी रूपयांचा तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. शिवाय, लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी एसटीची सुविधा सुरू असेल अशी माहिती अनिल परब यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक देखील उपस्थित होते. दरम्यान, सध्या एसटीची अवस्था फार चांगली नसल्याचे देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे. सांगा पालकमंत्री गेले कुणीकडे? असा सवाल करत राम कदम यांनी राज्यातील सर्वच पालकमंत्र्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टिका केली आहे.

पालकमंत्र्यांनी घराबाहेर पडून काम करणं अपेक्षित आहे. पण पालकमंत्री घरात असल्याची टिका राम कदम यांनी केली. दरम्यान, त्यांच्याकडे सध्या तेलढंच काम असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गावातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी ही गावा गावाला जोडण्याचं काम करते. पण सध्या कोरोनामुळे एसटी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x