वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखोंचा घोटाळा

ज्या लोकांनी खड्डे खोदण्याचं कामच केलं नाही, त्याच्या खात्यावर  करवीरच्या वनक्षेत्रपालांनी पैसे टाकल्याचं समोर आलं. 

Updated: Dec 7, 2017, 10:38 AM IST
 वृक्षारोपणाच्या नावाखाली लाखोंचा घोटाळा  title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर वनविभागातील करवीर वनक्षेत्रपालांनी  भ्रष्टाचार करुन खड्ड्यांचे पैसे कसे लाटले याचा शोध झी २४ तासनं घेण्याचा प्रयत्न केला. 

सुरुवातीला ज्या व्यक्तींच्या नावे मजुरीसाठी पैसे अदा केले त्याचा शोध दिलेल्या पत्यावर म्हणजेच घोसरवाडमध्ये घेतला. पण त्याठिकाणी गेल्यानंतर ती व्यक्ती दत्तवाडची असल्याचं समोर आलं. 

बोगस लाभार्थ्याची भेट

त्यानंतर आम्ही दत्तवाडमधल्या बोगस लाभार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. ज्या लोकांनी खड्डे खोदण्याचं कामच केलं नाही, त्याच्या खात्यावर  करवीरच्या वनक्षेत्रपालांनी पैसे टाकल्याचं समोर आलं. 

दत्तवाडमध्ये श्रीमंत तुकाराम कांबळे हे त्यापैकीच एक बोगस लाभार्थी आहेत.