भाजप ५१
शेकाप २३
राष्ट्रवादी २
काँग्रेस २
- दुपारी २.०० : पनवेलमध्ये भाजपची जोरदार मुसंडी... ५० जागांवर विजय घोषित
- दुपारी ०१.०३५ : पनवेल महापालिकेच्या ७१ जागांचे निकाल जाहिर...
भाजपा - ४८,
शेकाप - २२
राष्ट्रवादी - १
- दुपारी ०१.०५ : पनवेलमध्ये भाजपनं गाठली मॅजिक फिगर... ४० उमेदवार विजयी घोषित
- दुपारी ०१.०० : भाजपचा विजय हा पैशाचा विजय आहे... मतदारांना भुलवून हे यश मिळवलंय... दारू विक्रेते, गुंड निवडून आले - विवेक पाटील यांची प्रतिक्रिया
- दुपारी १२.५५ : पनवेल महापालिकेच्या ४९ जागांचे निकाल जाहिर...
भाजपा - ३२, शेकाप - १६ राष्ट्रवादी - १
- दुपारी १२.४५ : प्रभाग क्रमांक २ मध्ये शेकापचा विजय
अ. अरवींद म्हात्रे, शेकाप
ब. उज्वला पाटील, शेकाप
क. अरुणा दाभने, शेकाप
ड. विष्णू जोशी, शेकाप
- दुपारी १२.०० : भिवंडी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम मोहल्ल्यात कमळ फुललं... प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपचे उमेदवार विजयी
- सकाळी ११.५५ : पनवेलमध्ये मनोज काटेकर यांची सहाव्या वेळेस तर वंदना काटेकर यांची पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवड
- सकाळी ११.४५ : शेकापचे संदीप पाटील यांचा पराभव... काँग्रेसच्या लतीफ शेख यांचाही पराभव
- सकाळी ११.४० : प्रभाग क्रमांक १८ मधल्या चारही जागांवर शेकापचा विजय
- सकाळी ११.२५ : राष्ट्रवादीला धक्का : पक्षाचे नेते सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत पराभूत
- सकाळी ११.०९ : पनवेल वॉर्ड क्रमांक ७ मध्ये चारही जागांवर भाजपा विजयी
- सकाळी ११.०५ : प्रभाग क्रमांक १४ क मध्ये भाजपचे मनोहर म्हात्रे ६८८५ मतांनी विजयी
- सकाळी ११.१४ : प्रभाग क्रमांक १४ ब मध्ये शेकापच्या सारिका अतुल भगत ७०५९ मतांनी विजयी
- सकाळी ११.१३ : प्रभाग क्रमांक १४ अ मध्ये भाजपच्या हेमलता म्हात्रे ७४७९ मतांनी विजयी
- सकाळी ११.११ : भाजप २३, शेकाप ७, शिवसेना १ जागांवर आघाडीवर
- सकाळी १०.५५ : भाजप २४ आघाडीवर तर शेकाप आघाडी ९ जागांवर पुढे
- सकाळी १०.४१ : प्रभाग क्रमांक १७ - माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा दारुण पराभव
- सकाळी १०.४० : प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपचे चार उमेदवार विजयी
- सकाळी १०.३५ : प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपचे मनोज भुजबळ विजयी
- सकाळी १०.३० : प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपा विजयी
- सकाळी १०.१५ : प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपच्या हेमलता म्हात्रे आघाडीवर
- सकाळी १०.०० : पनवेल महापालिका निवडणूक : मतमोजणीला सुरुवात
पनवेल : रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत.
पनवेल महापालिकेसाठी भाजप आणि शेकापमध्ये जोरदार चुरस आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापसोबत महाआघाडी केली आहे. तर शिवसेना भाजपसोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेली आहे. त्यामुळे भाजपने आठवलेंच्या रिपाइंसोबत निवडणूक लढवली आहे. ग्रामीण भागात मतदान चांगले झाले असल्याने आघाडी की भाजप यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात विजयाची माळ पडेल हे निकालावरून कळेल.
मतमोजणीच्यावेळी कोणतीही गडबड होवू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त दर्जाचा एक अधिकारी, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 154 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1304 पोलीस कर्मचारी तसेच राज्य राखवी पोलील दलाची तुकडीही तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.