राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमाला हजारो लोकांची गर्दी होती. पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही

Updated: Jul 27, 2021, 08:09 PM IST
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमात कोरोनाचे नियम धाब्यावर title=

उस्मानाबाद : राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट असताना राज्याचे मंत्री मात्र कोरोनाचे नियम मोडताना दिसत आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध असताना राज्याचे भूकंप व पुर्नवसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कार्यक्रमामध्ये मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले आहेत. 

शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यु असताना. कळंब नगर शहरामध्ये बनसोडे यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला हजारो लोकं उपस्थित होते. बहुतांश लोकांच्या तोंडावर मास्क नव्हता. सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा उडविण्यात आला.

या कार्यक्रमास कळंबचे नायब तहसीलदार अस्लम जमादार आणि पोलीस अधिकारी तसेच कर्मचारीही उपस्थित होते. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कळंब नगर पालिकेला नोटीस बजावली आहे.