सीएसएमटी पूल दुर्घटना : 24 तासांत रिपोर्ट देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

24 तासांत रिपोर्ट देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला दिले आहेत.

Updated: Mar 15, 2019, 01:07 PM IST
सीएसएमटी पूल दुर्घटना : 24 तासांत रिपोर्ट देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश  title=

मुंबई : मुंबईत सीएसएमटी येथे पुन्हा पूल दुर्घटना झाली असून यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्घटनाग्रस्त पुलाचा सांगडा काढण्यास सुरूवात झाली आहे. बीएमसीच्या ए विभागाकडून सांगाडा काढण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. त्यामुळे संबंधित रस्ता संध्याकाळपर्यंत बंद राहणार आहे. यासंदर्भात 24 तासांत रिपोर्ट देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला दिले आहेत. या पुलाचे ऑडिट योग्य झाले होते का?  दुरुस्ती सुचवली होती, ती करण्यात आली होती का ? जर झाली नसेल का झाली नाही? असे प्रश्न आयुक्तांनी उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे अहवालात असली पाहिजते असा आदेश आयुक्तांनी दिला आहे. काल झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने स्वत:वरील जबाबदारी झटकत हा पूल रेल्वेच्या अख्त्यारीत येत असल्याचे सांगितले होते. पण आज पालिकेला उपरती आली असून हा पूल आपलाच असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. 

'पालिकेला पूल दुरुस्ती करता येत नाही आणि चाललेत कोस्टल रोड बांधायला'

काल सीएसएमटी येथे झालेल्या पुलाच्या दुर्घटने नंतर रेल्वेने शक्य तितकी मदद केल्याचे मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी माध्यमांना सांगितले.  मात्र हा पूल महानगर पालिकेचा आहे.आमच्या हद्दीत येत नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. तो त्यांच्या हद्दीतील पूल असल्याचे पालिकेने कबुल केल्याचेही ते म्हणाले. रेल्वे ने आम्हाला एनओसी दिली नाही पुलाचे काम करण्या संदर्भात या वर पीआरओ बोलले नाहीत असे पालिकेचे म्हणणे आहे.

'जबाबदारी आमचीच'

'त्या' पुलाची जबाबदारी आमच्यावर होती; अखेर मुंबई महानगरपालिकेला उपरती

दुर्घटनाग्रस्त पूल रेल्वेचाच असून त्याची दुरूस्ती मुंबई महानगरपालिका करत होती. मात्र, पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. यानंतर काही तासांत पालिकेने स्वत:हून हा पूल आमच्याच अखत्यारित येत असल्याची कबुली दिली. त्यामुळे आता पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.