योगेश खरे, झी मराठी, नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १५ जूनपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता , १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अर्थात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत . त्यानुसार नागरिकांना दुपारी ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आलीये . आवश्यक अनुज्ञेय कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावेत असेही यात सूचित केले आहे .
नागरिकांनी गर्दी कायम ठेवल्यास संसर्ग दर दहा टक्क्यांच्या वर जाऊ शकतो. हा दर सध्या आठ टक्क्यांच्या दरम्यान आहे. निर्बंध शिथिल होताच पोलिसांनी रस्त्यावर लोकांना विचारणा करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीसांची कुमक उपस्थित राहणे गरजेचे आहे हे होताना दिसत नाही. गर्दीवर नियंत्रण राहावे या कारणाने संचार बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार व दि . ३१ मे २०२१ रोजीच्या राज्य शासनाने पारीत केलेले आदेशातील निर्बन्ध काही अटी व शर्तीचे अधीन राहून दि . १५ जून २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत .