डी गँगच्या पंकज गांगरला अटक

 दाऊदचा भाऊ, इकबाल कासकरच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

Updated: Sep 28, 2017, 02:16 PM IST
डी गँगच्या पंकज गांगरला अटक title=

ठाणे : दाऊदचा भाऊ, इकबाल कासकरच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. पंकज गांगर असं कासकरच्या साथीदाराचं नाव आहे. डी गँगचा फायनान्सर म्हणून पंकज गांगरची ओळख आहे. खंडणी वसुलीसाठी धमकी देणाऱ्या गुंडांना पैसे पुरवण्याचे काम पंकज गांगर करत होता. 

पंकज गागरला बोरिवलीतून अटक करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ, इकबाल कासकरला अटक झाल्यानंतर, दाऊद इब्राहिमशी संबंधित अनेक लोकांची नावं समोर येत आहेत, तसेच दाऊद नेमकी मुंबईत कशी वसुली करतो, हे देखील समोर येत आहे.  पंकज गांगरला अटक करण्याची कारवाई ठाणे गुन्हे शाखेने केली आहे.