डी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2018, 08:18 PM IST
डी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत title=

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.

गुंतवणूकदारांचे पैसे थकविलेत

गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी अधिक चौकशीसाठी यापूर्वी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावली होती. याची मुदत आज संपली त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. 

आधी रवानगी पोलीस कोठडीत

डीएसके. आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीत अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर डीएसके चक्कर येऊन तुरुंगात कोसळले होते. त्यांच्यावर ससून आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर कुलकर्णी यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. 

अलिशान गाड्या जप्त

दरम्यान,  २६ फेब्रुवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या मालकीच्या ६ इम्पोर्टेड कार आणि एक दुचाकी जप्त केली होती.  २ बीएमडब्ल्यू, २ टोयोटा, १ ऑडी, १ पोर्शे या गाड्या जप्त करण्यात आल्यात. ६ कार आणि १ दुचाकी यांची किंमत ५ कोटी ८३ लाख रुपये आहे.