मुंडे घराण्याची 'पुढची पिढी' व्यासपीठावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत चिमुकलीची चर्चा

Updated: Aug 25, 2019, 07:58 PM IST
मुंडे घराण्याची 'पुढची पिढी' व्यासपीठावर

लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बीडमध्ये पोहोचली. पण यावेळी परळीतल्या या सभेत सर्वाधिक चर्चा होती ती एका चिमुकलीची. ही चिमुकली होती विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची कन्या, आदिश्री धनंजय मुंडे. 

व्यासपीठावरुन बाबा जोरदार भाषण करत होते. मग हे छोटं लेकरुनही दुडुदुडु धावत स्टेजवर जाऊन बसलं. स्टेजवर गेलं की पहिल्यांदा काय करायचं, तर हात वर करायचा...एवढा पहिला धडा चार वर्षांच्या आदिश्रीने एव्हाना अचूक गिरवलाय...तसंच तिनंही केलं. 

मग काय... ज्युनिअर धनंजय मुंडेंनी स्टेजवर ठाणच मांडलं. तिची गट्टी जमली ती स्टेजवरच्या अमोल काका आणि अजित काकांशी. 

अजित काकांनी मात्र खेळायला जा सांगताच मॅडम उठल्या आणि खाली पळाल्या. आणि मग पुन्हा तेच राष्ट्रवादीच्या गाण्यावर ठेका आणि गिरक्या...