नागपुरातील भाजप कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

Death threat to BJP Activist : भाजप कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे.  

Updated: Jul 13, 2022, 01:33 PM IST
नागपुरातील भाजप कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी title=
संग्रहित छाया

नागपूर : Death threat to BJP Activist : भाजप कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे. मनोज कुमार सिंग या भाजप कार्यकर्त्याला धमकी आल्याची माहिती देण्यात आली आहे. उदयपूर आणि नंतर अमरावती येथे झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. मनोज कुमार सिंग यांना पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे.

नागपूरच्या मानकापूर परिसरातील भाजप कार्यकर्ते मनोज कुमार सिंग हे अखंड भारत विचार मंच नावाची संघटना चालवत आहे. नेहमीप्रमाणे काल सकाळी ते मानकापूर स्टेडियममध्ये मॉर्निंग वॉकला मित्रांसोबत गेले होते. मॉर्निंग वॉक आटोपून परत जाताना त्यांच्या वाहनावर एक पांढरा कागद आणि त्यावर लाल अक्षरात काहीतरी लिहिल्याचे त्यांना त्यांना आढळले. कागद तपासल्यावर त्यावर ''मनोज एस यु डेड सून'' असं इंग्रजीत लिहिले होते, अशी भाजप नेते मनोज कुमार सिंग यांनी सांगितले.

धमकीचे हे पत्र पाहताच मनोज सिंग आणि त्यांच्या मित्रांनी मानकापूर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांत तक्रार नोंदविली. तक्ररीनंतर नागपूर पोलिसांनी मनोजकुमार सिंग यांना पोलीस सुरक्षा प्रदान केली असून पुढील तपास करीत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x