दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. राज्यात लॉकडाऊन लागू असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभुमीवर राज्यातील कैद्यांना कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर तुरुंगातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण होत असल्याने पॅनेलने हा निर्णय घेतलाय.
या पॅनलमध्ये न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्याच्या तुरुंग विभागाचे पोलीस महासंचालक एस. एन. पांडे तसेच अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदे यांचा समावेश आहे.
राज्यातील ६० तुरुंगात सध्या सुमारे ३५ हजार कैदी आहेत.