पुलावरच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यातील कळवा नवीन पुलावरून धनाजी कांबळे नावाच्या व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Dec 3, 2019, 12:25 PM IST
पुलावरच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे : ठाण्यातील कळवा नवीन पुलावरून धनाजी कांबळे नावाच्या व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याला खाली उतरवून त्याचा जीव वाचवला आणि त्याला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. धनजीचा मुलाचा मृत्यु झाला आहे. त्याच तणावात त्यांनी हे कृत्य केलं असावं, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धनाजी कांबळे यांचा जीव वाचवून त्यांना सिव्हिल रूग्णालयात दाखल करणारे पोलीस हवालदार पवार यांना पोलीस खात्याकडून कौतुक करण्यात येत आहे. कळव्यातील या गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्याने, या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. धनाजी कांबळे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.