थायलंड पेरूची लागवड या शेतकऱ्याला फायद्याची

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा पारंपरिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.

Updated: Dec 3, 2019, 12:00 PM IST
थायलंड पेरूची लागवड या शेतकऱ्याला फायद्याची

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा पारंपरिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मध्यंतरी या तालुक्याने डाळिंब लागवडीत आघाडी मिळवली होती, यानंतर आता पेरूचाही प्रयोग येथील शेतकरी करताना दिसून येत आहेत. अकोले वासूद येथील शेतकरी पांडूरंग आसबे यांना वीस एकर शेती आहे. आसबे हे पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर त्यांना नेहमीच्या पेरू पेक्षा आकाराने मोठा असलेला पेरू पाहण्यास मिळाला.

थायलंड पेरूची लागवड केल्यापासून बारा महिन्यात पेरू उत्पादन सुरू होते. एका झाडाला पंधरा किलो वजनाचे पेरू लागतात.सातशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत एका पेरूचे वजन भरते. 

दहा ते पंधरा दिवस हा पेरू चांगला राहतो. चव गोड आणि बी मऊ असल्याने खाण्यास चांगला आहे.या पेरूला किलो मागे  ७०-११०रूपये असा भाव मिळाला आहे.