शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? जाहीर सभेत स्पष्टच सांगितलं, 'होय, मी प्रत्येक...'

शरद पवार यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत का? प्रश्नावर धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 8, 2024, 07:08 PM IST
शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? जाहीर सभेत स्पष्टच सांगितलं, 'होय, मी प्रत्येक...' title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  राज्यात विधानसभा निवडुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वच नेते आक्रमक भाषण करताना करताना दिसत आहेत. अशातच झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत का? असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितले. 

'माझ्या विरोधात उमेदवार'

परळी हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. सध्या ते परळीचे विद्यमान आमदार आहेत. अशातच दुसरी विरोधी पक्षाला माझ्या विरोधात उमेदवार उभा करायचा आहे. तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटासाठी जागा आहे. त्याच ठिकाणी 12 ते 15 उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. पण त्या उमेदरांपैकी जे त्यांच्या पक्षाचे निष्ठावंत आहेत, त्यांच्या पैकी कुणालाही उमेदवारी दिलेली नाहीये. मात्र, जे पक्षात नाहीत अशा व्यक्तीला तिथे उमेदवारी दिली आहे. त्यांना परत एकदा समाजात वाद पेटवत ठेवायचा आहे. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

शरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? 

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या टार्गेवर धनंजय मुंडे आहेत का? असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले. होय, विधानसभा निवडणुकीत मला  टार्गेट केलं जात आहे. राजकारणात हे सर्व घडत असतं. प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना लक्ष केलं जात असतं. परंतु एखाद्यावर जास्तच लक्ष दिलं जातं. त्यामुळे माझं काय होईल हे ज्यांनी लक्ष दिलं त्यांच्यावर अधारित नाहीये. गेली अनेक वर्षे मी माझ्या मतदार संघात जी कामे करत आहे, किंवा तेथील जनतेच्या मनात जो मी एक विश्वास निर्माण केला आहे, ती मायबाप जनता ठरवणार आहे, माझं काय करायचं आहे. 

'ब्रेन मॅपिंग झाली पाहिजे'

ब्रेन मॅपिंग झाली पाहिजे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी जे बोलतो त्यावर मी कधीच माघार घेत नाही. मी जे बोलते त्यावर मी ठाम पणाने राहतो आणि ते खरं करून दाखवण्याची माझी ताकद आहे. त्याच्या शिवाय मी बोलत नाही. मी त्या सभेत तारखा आणि मुहूर्त देखील सांगितला. त्यानंतर मी बोललो की हे जर खोटं असेल तर ब्रेन मॅपिंग करा. त्यामध्ये काय चुकलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x