धुळ्यात शीतगृह जळून खाक, बारा तासानंतर आग आटोक्यात

धुळे  जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

Updated: Sep 3, 2019, 01:34 PM IST
धुळ्यात शीतगृह जळून खाक, बारा तासानंतर आग आटोक्यात title=

धुळे : जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. हे संपूर्ण शीतगृह जळून खाक झाले आहे. गेल्या बारा तासापासून अग्निशमनदल ही आग विझविण्याचे काम करत आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आग धुमसताना दिसत आहे. दरम्यान, या आगीत  अन्न धान्य आणि फळांचे मोठे नुकसान झाले आहे.

ही आग विझवण्यासाठी सुरत, नाशिक आणि आजूबाजूच्या सर्व नगरपालिका, महानगरपालिकेतून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले आहेत. तसेच नाशिक आणि सुरत येथून फोम टेंडर आग विझवण्यासाठी मागवले आहेत. के एस शीतगृहला ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, या शीतगृहाचा आता फक्त सांगाडा उरला आहे. त्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी कडधान्य, बटाटे आणि काही फळे ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत. त्यामुळे अन्न धान्य आणि फळांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.