धुळे: राईनपाडा सामूहिक हत्येतील मृतांची ओळख पटली

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज धुळे दौऱ्यावर जाणार आहेत.

Updated: Jul 2, 2018, 10:43 AM IST
धुळे: राईनपाडा सामूहिक हत्येतील मृतांची ओळख पटली title=

धुळे: जिल्ह्यातील राईन पाडा गावात घडलेल्या सामूहिक हत्या प्रकरणातील मृतांची ओळख पटली आहे. मृतांपैकी सर्व जण सोलापूर तालुक्यातील असून भिक्षा मागून व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे.

पाच जणांना बेदम मारहाण

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केली. मुलं पळवणारी टोळी समजून जमावाने या पाच जणांना बेदम मारहाण केली. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, मारहाण प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज धुळे दौऱ्यावर

दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज धुळे दौऱ्यावर जाणार आहेत.