योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे नाशिक शहरामध्ये पाणीपुरवठ्याचे जलसंकट निर्माण झाले आहे. एक वेळ पाणीपुरवठाची पाणीकपात वाढवून आता आठवड्यातून एक दिवस पाणी बाणी होणार आहे. नाशिकमध्ये दर गुरुवारी पाण्याचा ड्रायडे ठेवण्यात येणार आहे. या ड्रायडेमुळे ५० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. नाशिक महापालिकेने पाऊस कमी होत असल्याने तातडीचा उपाय म्हणून हे आदेश जारी केले आहेत.
मुंबई, नगर, औरंगाबाद, मराठवाड्याला पाणी पुरवणारा हा जिल्हा आता आपल्याच वावटळीत अडकला आहे. उन्हाळ्यात साडेचारशे टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ ग्रामीण भागात आली होती. तर मनमाडमध्ये महिनाभराने पाणी पुरवले जाते. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक या परिस्थितीमुळे अडचणीत आला आहे.