'माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं'-खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 28, 2017, 08:20 PM IST
'माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं'-खडसे title=

जळगाव : जे लोकांच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही, माझ्या मनात जे आहे, ती मी अजितदादांच्या कानात सांगितलं, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

खडसे राष्ट्रवादीत जातील, चर्चेला पूर्णविराम

राष्ट्रवादीचे एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार सतीष पाटील यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम जळगावात पार पडला. या कार्यक्रमासाठी भाजपचे एकनाथ खडसे उपस्थित होते, यानंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत की काय? अशी चर्चा जिल्ह्यातील लोकांमध्ये सुरू होती.

माझं 40 वर्षांचं भाजप व्रत तुटणार नाही

 या चर्चेला एकनाथ खडसे यांनी उत्तर देतांना सांगितलं, जे लोकांच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही, माझ्या मनात जे आहे, ती मी अजितदादांच्या कानात सांगितलं, मी 40 वर्ष पक्षात आहे, माझं भाजप व्रत तुटणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं.