तर मग ठरलं… नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

खडसे समर्थकांची बॅनरबाजी...

Updated: Oct 21, 2020, 09:42 AM IST
तर मग ठरलं… नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करणार ? title=

जळगाव : आज सायंकाळी एकनाथ खडसे हे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा मजकुराचा मॅसेज सोशल मीडियात फिरत असतांना मुक्ताईनगर तालुक्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे.य 'भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण… तुम्ही ठरवाल तेच धोरण असा मजकूर टाकून आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे बॅनर झळकल्याने एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. 

आतापर्यंत एकनाथ खडसे हे भाजप पक्ष सोडलेला नाही असं म्हणत होते. पण आता त्यांनी स्वत: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं पंतप्रधान मोदींवर टीका करणारं ट्विट रिट्विट करुन राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

दुसरीकडे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर मात्र भाजप पक्षाचे कोणतेही चिन्ह नाही. मुक्ताईनगरमधील खडसेंच्या फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत त्यांचे विश्वसनीय समर्थकांचे म्हणणं आहे की, लवकरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील.